आपण प्रदक्षिणा का करतो

आपण प्रदक्षिणा का करतो

श्रेणी: Samhitas | लेखक : The HIndu Today | दिनांक : 13 April 2020 23:47

जर आपल्याला गोल काढायचा असेल तर त्याचा केंद्रबिंदू असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, देव हा आपल्या जीवनाचे केंद्र आहे, तो आपल्या जीवनाचा मूळ आणि सार आहे. जेव्हा आपण आपल्या जीवनात दैनंदिन कामे करत असतो, तेव्हा मनातल्या मनात कुठेतरी देवाचे ध्यान करत असतो. आपण त्या शक्तीला आपला केंद्रबिंदू मानतो. प्रदक्षिणा म्हणजे परिक्रमा याचा देखील हाच अर्थ आहे. हा एक संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे देवाभोवती फिरणे.

प्रदक्षिणा नेहमी डावीकडून उजवीकडे केली जाते. भारतात उजवी बाजू शुभ मानली जाते. जेव्हा आपण प्रदक्षिणा करत असतो, तेव्हा आपण स्वतःला आठवण करून देतो की आपण धर्माच्या मार्गावर चालत शुभ आणि पवित्र जीवन जगू आणि देव आपल्या उजव्या बाजूला आणि आपल्या सोबतच आहे. ज्याप्रमाणे एका गोलामध्ये केंद्राच्या आसपासचे अंतर केंद्र बिंदूपासून समान असते, त्याच प्रकारे आपण कुठेही गेलो, आपण काहीही बनलो, तरी  देवापासून आपले अंतर समान असते. म्हणजेच, आपण देवापासून तितक्याच जवळ असतो. देवाची कृपा आपल्यावर कोणताही पक्षपात न करता सदैव असते.

आपल्या धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की - मातृदेवो भव:, पितृदेवो भव:, आचार्यदेवो भव:| म्हणजे आपले आई, वडील आणि शिक्षक आपल्याला देवा सारखेच आहेत, म्हणून आपण त्यांना आणि अशा कोणत्याही व्यक्तिला प्रदक्षिणा घालतो ज्याला आपण देवासमान मानतो.

पुष्कळ वेळा आपण पूजा केल्यानंतर स्वत: भोवती प्रदक्षिणा घालतो. या प्रदक्षिणेवरून असे सूचित होते की आपल्यामध्ये देखील देवाचे अस्तित्व आहे. आपण स्वत:ला प्रदक्षिणा घालतो आणि स्वतःला आठवण करून देतो की आपण ज्या देवतेची उपासना बाहेर करतो ती आपल्या शरीरामध्ये देखील विराजमान आहे.